चाळीसगाव राजमुद्रा वृत्तसेवा | ईडी च्या माध्यमातून विरोधकांना नामोहरम करण्याचा डाव मांडला जात आहे, कोणतीही चूक नसताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असून यातूनच एकनाथराव खडसे यांच्यावर दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून संकट काळात आम्ही त्यांच्या सोबत आहोत असा देखील आशावाद जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
ईडी मुळे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या भोवती चौकशीचा ससेमिरा सध्या सुरू आहे, त्यामुळे खडसे यांचा परिवार देखील अडचणीत आलेला आहे त्यांचे जावई गिरिष चौधरी यांना अटक केली गेल्या अनेक दिवसांपासून ईडीच्या कस्टडीत आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयात खडसे यांचे जावई चौधरी यांचा जामिनासाठी विनंती करण्यात आली होती, मात्र त्यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला यामुळे आणखी अडचणीत भर पडली आहे.
ना जयंत पाटील हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून चाळीसगाव तालुक्यात झालेल्या पूरग्रस्त स्थितीची पाहणी करण्यासाठी ते आले आहेत.