पुणे राजमुद्रा वृत्तसेवा |विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या त्यातून राजू शेट्टी यांचे नाव काढल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. याबाबत राजू शेट्टी यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा स्पष्टीकरण दिल आहे. आता राज्यपालांनी त्यावर अंतिम निर्णय घ्यायचा आहे असं शरद पवार म्हणाले ते पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते शेट्टीं यांच्या आमदारकी बाबत बोलताना आमदारकीचा चेंडू पवारांनी राज्यपालांच्या कोर्टात टाकला आहे.
पवार यांनी माध्यमांशी बोलताना ते नाराज असतील तर त्याबाबत मला काही म्हणायचं नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने यादी माननीय राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या वतीने देण्यात आली त्यात राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्राचे योगदान दिले आहे ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावा असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा निर्णय अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाहीये एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतचा अंतिम भूमिका जाहीर करू अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. राज्यपाल नियुक्त आमदार तिचा निर्णय हा त्यांनी घ्यायचा असतो याच्यावर विधाना करण्याची गरज काय असा सवाल राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणाने केले मात्र शेठ यांनी काय केलं त्यावर मला भाषा करायचं नाही मी दिलेला शब्द पाळला आहे, आत्ता राज्यपाल काय करतात त्याची वाट आम्ही बघतोय असं सुद्धा शरद पवार म्हणाले आहे.