जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राजकीय नेते म्हटल्यावर फॉर्म हाऊस हा शब्द येतो त्याच धरतीवर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन यांनी त्यांच्या तांदलवाडी या भागा नजीक भव्य असे फार्म हाऊस उभारल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. प्रशस्त असे फार्म हाऊस ला माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी भेट दिल्याने हे फार्म हाऊस अधिक लक्ष केंद्रित झाले आहे. तापी पट्ट्यातील अनेक राजकीय घडामोडी व आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपाचे संघटन पुन्हा जोमाने वाढावे यासाठी पडद्यामागील हालचाली उपयुक्त बैठकांना त्यासाठी या फॉर्मचा अधिक उपयोग होऊ शकतो.
कारण एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यापासून आगामी निवडणुकीत सत्ता प्रस्थापित करण्यासाठी भाजपाचे नेते गिरीश महाजन सक्रीय झाले आहे. त्यादृष्टीने नियोजनबद्ध काम आणि जबाबदारी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. त्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन आराखडा व भविष्यातील राजकीय हालचाली यावर बारीक नजर ठेवून राजकीय डावपेच आखले जाणार आहे. आतापासून निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपाने व्युव्हरचना आखण्यास सुरुवात केली आहे. म्हणून सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे पाहिले जाते कोणत्याही परिस्थिती मध्ये जिल्हा बँक आणि संचालक जास्तीत जास्त बसवून बँक आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी भाजपाचा गोपनीय डाव असल्याचे बोलले जात आहे. भाजपाने मध्यवर्ती सहकारी बँकेवर अध्यक्ष सह बँक आणि जास्तीत जास्त संचालक निवडून येतील यासाठी नियोजनबद्ध आखणी केली आहे. अद्याप जरी ओपन केले नसले तरी मात्र त्या दृष्टीने सर्व तयारी आणि मतदारांच्या याद्या ताब्यात घेऊन त्याचे नियोजन सुरू झाले आहे.
जामनेर शहर आणि तालुक्यातून भाजपाची जिल्ह्यात प्रमुख सूत्रे फिरतात, गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून आणि त्यांनी केलेल्या मांडणीतून नवनवीन संकल्पना राजकीय घडामोडी घडतात. महाजन यांच्या भूमीकडे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांचे लक्ष लागून असते आगामी होणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल असले तरी मात्र आ.महाजन वेगळे खेळी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांना बँकेच्या अध्यक्षपदी बसवण्यासाठी त्यांचा भविष्यात विचार असल्याची शक्यता आहेत. मात्र यासाठी त्यांना जिल्ह्यातील सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन मोठ्या कौशल्याने ही खेळी खेळावी लागणार आहे. त्यातच जिप चे माजी उपाध्यक्ष नंदू महाजन यांनी तांदळवाडी गावात बांधलेल्या आलिशान फार्म हाऊस सध्या राजकीय नेत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण भविष्यातील राजकीय घडामोडी येथून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रावेर, भुसावळ, सावदा, जामनेर, मुक्ताईनगर, बोदवड संपूर्ण भाग पिंजून काढून त्याचा बारकाईने अभ्यास करण्यासाठी भाजपाने स्वतंत्र यंत्रणा कामाला लावली आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या उद्दिष्टने लक्षात घेऊन आपल्या खास मर्जीतील उमेदवाराची तयारी केली जाण्याची शक्यता गिरीश महाजन यांच्या समर्थकांनी व्यक्त केले आहे. या अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या फार्महाऊसमध्ये भाजपाच्या होणाऱ्या गोपनीय बैठका, महत्त्वाचे निर्णय पडद्यामागे हालचाली याचे संकेत देणारे आहेत.
या प्रसंगी गिरीश महाजन,भा.ज.पा जिल्हाध्यक्ष आ. राजु भोळे,जि.प.अध्यक्षा ना.रंजना पाटील,कि.मो.उ.म.स.प्र सुरेश धनके, पद्माकर महाजन,प्रल्हाद पाटील,श अजय भोळे,जिल्हा सरचिटणीस सचिन पाटील,जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील,यु.मो.जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,कि.मो. जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी भा.ज.पा तालुका अध्यक्ष राजन लासुरकर, सभापती कविता कोळी, यु.मो.ता.अ महेंद्र पाटील,मु.नगर यु.मो.ता.अ अंकुश चौधरी,सरचिटणीस महेश चौधरी,पं.स.सदस्य पी.के.महाजन, जुम्मा तडवी, जितेंद्र पाटील, सुनील पाटील,हरीलाल कोळी,भा.ज.पा ता.उपाध्यक्ष वासुदेव नरवाडे,महेश पाटील आदी उपस्थित होते.