पुणे राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेच्या पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक बोलावली आहे येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतल्या पक्ष कारला ते महत्त्वाची बैठक पार पाडण्यात येणार आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्वपूर्ण बैठक पार पडत आहे त्यामुळे या बैठकीत निवडणुकीसंबंधी काय रणनीती आखली जाते उमेदवारांना कशा पद्धतीने न्याय दिला जातो यावर चर्चा होणार असल्याने राष्ट्रवादीचे सर्व पक्षश्रेष्ठी नेते पदाधिकारी लक्ष लागून आहे. राष्ट्रवादीने पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केलेले आहे.
पुढच्या महिन्यात राज्यामध्ये काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत पाच महापालिकांच्या निवडणुका देखील पार पडत आहेत. त्या दृष्टीने या बैठकीत नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना व विविध विषयांवर चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे राज्य जरी महा विकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत असल्याने स्थानिक पातळीवरील निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांवर पक्ष होण्याची शक्यता आहे. काही उमेदवार विधानसभा निवडणुकीत अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत अशा नेत्यांवर काही जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे 8 सप्टेंबरला निवडणुका आणि त्या संबंधित चर्चा पार पडणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले आहे.
गेल्या महिन्यात देखील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलावून त्यांचे खाते अंतर्गत असलेल्या विषयांवर शरद पवार यांनी चर्चा केलेली आहे मात्र मंगळवारी अर्थात 31 ऑगस्टला ही बैठक पार पडले आहे. महा विकास आघाडीच्या नेत्यांना येणाऱ्या नोटिसा भाजपचे नुकतीच झालेली जन आशीर्वाद यात्रा या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याची माहिती मिळाल्याचे समजते. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ,मंत्री छगन भुजबळ, मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री राजेश टोपे ,मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व सोडा मंत्र्यांचा समावेश होता.