जळगाव ( बोदवड ) राजमुद्रा वृतसेवा | भारतीय जनता पार्टी बोदवड़ तालुका तर्फे आता पर्यंतचे सगळ्यात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.भाजपा च्या चिन्हावर निवडून येऊन आलेले लोकप्रतिनिधी आपल्या पक्षाचे कार्यक्रम सोडून दुसऱ्या पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्यामुळे नगराध्यक्षांसह,नगरसेवक,४ पं.स सदस्य, व १ जी.प सदस्यांसह १३ जनांना बजावली कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आ.राजूमामा भोळे यांना ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदाची जबबदारी आल्या नंतर भाजप मधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.
काय आहे नोटीस मध्ये जाणून घ्या..
आपण भारतीय जनता पार्टीचे चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात, आणि आपण जाणून आहात मागील ६ महिन्यापासून आज गायत म्हणजेच मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहराच्या वतीने प्रदेशावरून आलेले अनेक समाजभिमुक व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबविण्यात आले, त्यात आपण या पैकी एकाही कार्यक्रमास जाहीर आव्हाना नंतरही उपस्थितीत राहू शकला नाहीत. पक्षचिन्हावर निवडणूक लढवून लोक- नियुक्त होऊन आपण उपस्थिती लावणे हे पक्ष बांधणीसाठी आपले दायित्व ठरत होते.या खेरीज अन्य पक्षाच्या कार्यक्रमात आपण वा आपले पती /मुल /जवळची नातलग अतिशय शिथापीने काम करतांना आढळली तरी! आपल्या या अशा संभ्रमात टाकणाऱ्या कृती मुळे कार्यकर्त्यां मध्ये आपल्या सारख्या जबाबदार लोकनियुक्त व्यक्तीबद्दल नाना प्रकारचे कयास लावले जात आहेत तरी आपण जाणून आहोत की आपल्या पक्षसंघटन अनुशासनाचा एक भाग म्हणून आपण आपल्या अनुपस्थितीचे व अन्य पक्षातील आपल्या उपस्थितीचे योग्य ते कारण विषद केले पाहिजे तरी प्रदेश कार्यालय व जिल्हा कार्यालया वरुन आलेले पक्षादेश पाळून आपण लवकरात लवकर आपले लेखी उत्तर ७ दिवसांच्या आत आपले जिल्हाध्यक्ष किंवा मंडळ अध्यक्ष यांना कळवावे असे दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.
७ दिवसांच्या आत लेखी द्यावे अन्यथा कार्यवाही करण्याचे संकेत बोदवड भाजप कडून देण्यात आले आहे. लोकप्रितिनिधी कार्यवाही टाळण्यासाठी काय कारण देतात याकड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.