जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा | चाळीसगाव तालुक्यानंतर जामनेर तालुक्याला देखील अतिवृष्टीने झोडपले आहे. जामनेरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झालेय. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी शेतबांधावर जाऊन आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले. दुसरीकडे तर पूरग्रस्त नागरिकांना रडूच कोसळले. यावेळी गिरीश महाजन यांनी त्यांचे सांत्वन करत सर्वप्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.
काल जामनेर तालुक्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे शेतमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले होते आमदार गिरीश महाजन हे मुंबई येथे असल्या कारणाने त्यांनी रात्री तात्काळ विमानाने जामनेर गाठले व सकाळपासुनच नुकसानग्रस्त भागाचा पाहीनी दौरा अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सुरू केला यावेळी झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करत असताना मागील सव्वा दोन वर्षांपासून सत्तेत असलेल्या सरकारने शेतकऱ्यांच्या वेळोवेळी झालेल्या नुकसानी संदर्भात कुठलीही आतापर्यंत नुकसान भरपाई दिली नाही सत्तेत असलेलं सरकार हे निगरगट्ट असून गेंड्याच्या कातडीचा आहे असा घणाघात आमदार महाजन यांनी यावेळी व्यक्त केला