जळगाव जिल्ह्यातील नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांचा यांना मदतीचे आवाहन..
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जिल्ह्यातील नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांचे अतिवृष्टी मध्ये झालेल्या पावसामध्ये घर को सोडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सतत चाललेल्या पावसामुळे शाहीर शिवाजीराव पाटील यांच्यासारख्या अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. संपूर्ण संसारोपयोगी अत्यावश्यक असणाऱ्या वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने संपूर्ण संसाराची राख रांगोळी झालेली आहे. शाहीर परिवाराला शासनाच्या वतीने तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी असं विनम्र आवाहन महाराष्ट्र राज्य शाहीर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
शाहीर शिवाजीराव पाटील यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून महाराष्ट्र भर जनजागृती करण्याचे काम केले आहे. मुगुटमणी म्हणून त्यांनी शिव चरित्रावर पोवाड्यांच्या माध्यमातून लोकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोककलेला वाहून आतापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले असून कलेचा वारसा म्हणून अनेक शाहिरांचे आयुष्य उभे करण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी जळगाव जिल्ह्यात उभ्या केल्या अनेक शासकीय योजनेवर प्रचार – प्रसार करून महाराष्ट्रात शाहीर या नावाला मानाचा तुरा मिळवला, मात्र त्यांची परिस्थिती फार हलाखीची असून कमावता घरामध्ये एकच मुलगा आहे, अशा परिस्थितीत शासनाने ताबडतोब त्यांची दखल घेऊन त्यांना घराची नुसकान भरपाई देऊन त्यांना त्वरित घर बांधून देण्यात यावे व तातडीची मदत जाहीर करावी असे आवाहन महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. या सोबत ज्या दानशूर दात्यांना शक्य असेल त्यांनी आपली मदत पोहचवावी असे सांगण्यात आले आहे.