जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिल्लीतील कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. यावर आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भुजबळांचा तोंडभरुन कौतुक केलं आहे. ‘त्यांनी चुकीचं कामच केलं नव्हतं’, असं गुलाबराव पाटील म्हणाले.
छगन भुजबळ यांनी जे काम केलं होतं, ते योग्य पद्धतीनेच केलं होतं, यावर आज कोर्टाच्या निकालाने शिक्कामोर्तब झालं आहे. शेवटी न्यायदेवतेने हा न्याय दिलेला आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल, असं गुलाबराव पाटील म्हणाले. छगन भुजबळ यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्यानेच न्यायदेवतेने त्यांना निर्दोष सोडले आहे. पण त्यांना झालेला हा त्रास कधीही भरुन निघणार नाही. शेवटी न्यायदेवतेने हा न्याय दिलेला आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागेल. भुजबळ यांनी जे काम केले होते, ते योग्य पद्धतीने होते, यावर आज या निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे.
कोणाची नाव वगळली ?
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकण कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज भुजबळ, पुतण्या माजी खासदार समीर भुजबळ, तनवीर शेख, इरम शेख, संजय जोशी, गीता जोशी, पीडब्ल्यूडी सचिव गंगाधर मराठे यांचं नावही महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून वगळण्यात आलं आहे.