जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | नुकत्याच पनवेल येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्यात. या स्पर्धेत जळगाव जिल्हातर्फे धरणगाव येथील कुस्ती पटू सहभागी झाले होते. राज्यस्तरीय स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन कुस्ती स्पर्धेत पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याने सुवर्णपदक जिंकले आहे.
या कुस्ती स्पर्धेत २ गोल्ड मेडल धरणगावमधील महेश रमेश वाघ ५५kg, सौरभ राजेंद्र पवार ५७k गटात तसेच शितांशू शिवाजी चौधरी ३८kg, दीपक रावसाहेब खैरनार ५१k, चैतन जिजाबराव माळी ६३kg गटात सिल्व्हर मेडल मिळाले. जळगाव जिल्हा स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष व झोनल इंचार्ज दिव्या भोसले व जिल्हा सचिव योगेश चौधरी व कुस्ती कोच संदीप कंखरे यांच्या मार्गदर्शनखाली सहभागी झाले होते.
राज्यस्तरीय स्टुडंट्स ओलंपिक असोसिएशन कुस्ती स्पर्धेत पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्याने सुवर्णपदक जिंकले आहे. जळगाव जिल्ह्यातून या स्पर्धेत ८ खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील ५ कुस्ती पटूंनी मेडल जिंकले आहे. यानंतर १७, १८ व १९ स्पटेंबरला रोहतक हरियाणा येथे नॅशनल स्पर्धा होणार आहे, असे जिल्हा अध्यक्ष तेजस पाटील यांनी सांगितले. विजयी कुस्ती खेळाडूंचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे.