(धुळे राजमुद्रा वृत्तसेवा) धुळे येथील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी रोहित चांदोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे व जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते रोहित चांदोडे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. याप्रसंगी ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, संघटन सरचिटणीस यशवंत येवलेकर, सरचिटणीस चंद्रकांत गुजराथी, ओम खंडेलवाल, उपाध्यक्ष अजय अग्रवाल, शशी मोगलाईकर, कुणाल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
रोहित चांदोडे हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत अनेक वर्षांपासून कार्यरत असून अनेक सामाजिक कामांना हातभार लावलेला आहे. चांदोडे यांनी अनेक सामान्यांची कामे मार्गी लावण्याकरिता तीव्र आंदोलनेही केली आहेत. ‘तरुणांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे युवा नेतृत्व शहराला लाभले असून धुळे महानगर भाजपची तरुण टीम जोमाने कार्य करून पक्ष संघटना मजबूत करेल’ असा विश्वास डॉ. भामरे यांनी व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनीही पूर्ण ताकदीनिशी काम करण्याचे व संघटन मजबूत करण्याच्या सूचना रोहित चांदोडे यांना दिल्या आहेत.
चांदोडे यांच्या नियुक्तीबद्दल माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री विजयकुमार रावल, आमदार अमरीश भाई पटेल, आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर चंद्रकांत बापू सोनवणे, उपमहापौर कल्याणीताई होळकर, स्थायी समिती सभापती संजय जाधव, महिला बालकल्याण सभापती वंदना थोरात, सभागृह नेते राजेश पवार, नगरसेवक नागसेन बोरसे, ज्येष्ठ नेते विजय पाच्छापुरकर, जयश्रीताई अहिरराव, मायादेवी परदेशी, अमोल धामणे, सोशल मीडिया प्रमुख मयूर सूर्यवंशी यश कदमबांडे आदींनी रोहित चांदगुडे यांच्या नियुक्ती बद्दल अभिनंदन केले.