मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. दरम्यान, आता गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? असा प्रश्न विचारला जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीच चार नावं घेतली जात आहेत. त्यामुळे प्रामुख्याने नितीन पटेल, चंद्रकांत रघुनाथ पाटील, मनसुख मांडवीय आणि गोवर्धन जफादीया यांची नावं चर्चेत आहेत. मात्र, समाजाचा पाठिंबा असलेल्या नेत्याच्या गळात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीच ‘ही’ आहेत नावे
नितीन पटेल
रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता आहे. नितीन पटेल हे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते.
मनसुख मांडविय
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मनसुख मांडविय यांच्याकडे केंद्रीय आरोग्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मांडविय या पूर्वी जलमार्ग राज्यमंत्री, रसायन आणि उर्वरक राज्यमंत्री राहिलेले आहेत. २०१६ मध्ये त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळवलं होतं. २०१२ साली ते पहिल्यांना राज्यसभेवर गेले. त्यानंतर २०१८ मध्ये पुन्हा एकदा राज्यसभेत त्यांची निवड झाली. मांडविय हे सौराष्ट्रातून येतात.
सी.आर. पाटील
गुजराज भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील अर्थात चंद्रकांत रघुनाथ पाटील यांचंही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. भाजपने गुजराजमध्ये नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाटील यांच्या नेृत्वातच लढवल्या होत्या. असं असलं तरी गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं वर्चस्व आहे.
गोवर्धन जदाफिया
गुजराजमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अजून एक नाव घेतलं जात आहे. ते नाव आहे गोवर्धन जदाफिया यांचं. गोवर्धन झडाफिया हे गुजरात भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. २००२ च्या गुजरात दंगलीवेळी ते राज्याचे गृहराज्यमंत्री होते. तसंच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी जदाफिया यांच्यावर भाजपने उत्तर प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी दिली होती.