रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | साकी नाका परिसर मुंबई येथे घडलेली,सार-या महाराष्ट्राला हादरवून सोडणारी तेवढीच मनाला सुन्न करणारी घटना घडल्याने संपूर्ण महिला दहशतीत असून या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत.आमच्या संघटनेच्या प्रदेश सचिव सिमाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सुरक्षा संघटना महाराष्ट्र राज्य शाखा रावेर यांच्या वतीने तिव्र निषेध नोंदवून,निवेदन देण्यात आले.यावेळी महिला सुरक्षा संघटनेच्या अध्यक्षा कांता बोरा,सचिव कल्पना पाटील,उपाध्यक्षा श्रीमती शारदा चौधरी सहसचिव भाग्यश्री पाठक, जनसंपर्क प्रतिनिधी सुनिता डेरेकर,मिडिया प्रमुख मनिषा पाचपांडे,या संघटना प्रतिनिधी उपस्थित होत्या.