मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महा विकास आघाडीच्या नेत्यांविरोधात संघर्ष सुरू केला आहे. एकामागे एक भ्रष्टाचाराची मालिका ते उघडकीस येत आहेत, आधी 11जणांवर वर थेट आरोप करीत त्यांनी एका मंत्राचा नाव घेतलं होतं. यामध्ये आता हसन मुश्रीफ यांचे नाव पुढे येत आहे हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती संत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सत्तावीसशे पानांचे पुरावे इन्कम टॅक्स ला दिले असल्याचे सांगितले जात आहे. या संबंधी किरीट सोमय्या अधिकृत पत्रकार परिषद देखील घेणार असल्याचे सूत्रांनी कळविले आहे.
ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हन ची नाव मी जाहीर केली होती दुर्दैवाने यामध्ये काही नाव राखीव असून यामध्ये प्रताप सरनाईक भाऊ नालावडी महापौर किशोरी पेडणेकर जितेंद्र आव्हाड यशवंत जाधव यामिनी जाधव अनिल परब अनिल देशमुख यांची नावे प्रामुख्याने होती आता यामध्ये राखीव खेळाडूंचाही समावेश असल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे.
बाप बेटी दोघांच्या 27 कोटी चे पुरावे आमच्याकडे असल्याचा सोमय्या यांनी दावा केला आहे असं मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाउंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवण्यात आले आहे. 2018 – 19 मध्ये इन्कम टॅक्स ने मुश्रीफ यांच्या घरावर धाड देखील टाकल्या होत्या बेलामी ट्रांजेक्शन 127 कोटी चा गैरव्यवहार झाल्याचे सोमय्या यांनी सांगितले आहे. उद्या या संदर्भात मुंबई अधिकृत तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले 2700 पानांचे पुरावे देखील देणार आहे माझ्याकडे दोन मंत्र्यांचे फाईल तयार होत आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे यामध्ये दोन मंत्र्यांचा समावेश आहे आणखी यामध्ये अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येण्याची शक्यता असल्याची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे.