कोल्हापूर राजमुद्रा वृत्तसेवा | भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे राज्यातील मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या फॅमिलीसह 127 कोटीचा अपहार केल्याचा आरोप केल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी तातडीची कोल्हापुरात पत्रकार परिषद घेत सोमय्या यांनी केलेला दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप या पत्रकार परिषदेत मुशर्रफ यांनी फेटाळून लावले आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांवर शंभर कोटीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही वेळापूर्वीच मुंबई येथे पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात मोठा बॉम्ब टाकणार असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार त्यांनी आज सोमवार रोजी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले असं मुश्रीफ यांच्याविरुद्ध बंद पडल्याने मुश्रीफ यांची राजकीय अडचण करण्याचा प्रयत्न केला आहे.
किरीट सोमय्या यांनी माझ्या पक्षाविरुद्ध पवार साहेबां विरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटी चा घोटाळ्याचा आरोप केला किरीट सोमय्या यांच्या सीए पदवी बद्दल शंका आहे कारण की त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती ioc च्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर ती खोटी माहिती खोटी असती तर त्याच वेळी समोर आला असतं आम्ही निवडणूक आयोगालाही पत्र दिले आहेत आपण नवं काय करतोय असा राणा भीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्स नंतर टाकले त्यात काहीच मिळालं नाही अडीच वर्ष झाली दारू टाकून त्यावर काही कारवाई नाही आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहे. असे माध्यमांसमोर बोलताना मुश्रीफ यांनी सांगितले.