जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील रस्त्याच्या समस्यांवरून आमदार राजूमामा भोळे हे अचानक सक्रिय झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. रस्त्यावरून आतापर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तक्रारी येत आहे, याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आमदार भोळे यांनी केला आहे. यावरून गेल्या अनेक दिवसापासून शहरात न आढळून आलेले आमदार मामा नागरिकांच्या समस्यांवरून अचानक सक्रिय झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यापासून अद्यापपर्यंत भाजपकडून रस्त्याविषयी ठोस अशी भूमिका घेण्यात आली नव्हती सत्तांतर झाले मात्र स्वतः जाऊन देखील विरोधाची भूमिका पार पाडण्यास विरोधक कमी पडत आहे. याबाबत जनमानसात कुजबुज होती. पावसा चा शेवटचा टप्पा सुरू असताना आमदार भोळे यांना रस्त्याबाबत वाढलेली चिंता यावर देखील तर्क-वितर्क लढवले जात आहे. शहराचे आमदार म्हणून आमदार भोळे यांनी नागरिकांना खड्डे व रस्त्यांचा, चिखलाचा त्रास होत असताना त्यावेळी नेमके कुठे होते ? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. साडेचार लाख जळगावकरांनी मतदान देऊन आ. राजू मामा यांनी जळगावकरांच्या पथ्यावर काय पाडले ? याबाबत देखील नाराजी जळगावकरांमध्ये आहेच.
दरम्यान, पावसाळा सुरू असल्याने जळगाव शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत खराब आहे. वारंवार नागरिकांनी आंदोलने, मागणी केल्यानंतर मनपातर्फे शहारतील रस्ते दुरुस्तीला सुरवात झाली आहे. परंतु या रस्ते दुरुस्तीकडे मनपा प्रशासनाचे लक्ष नसून निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचा आरोप जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे.
आज मनपातर्फे शहारतील डी- मार्ट परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू होते. आमदार सुरेश भोळे हे कामाच्या पाहणीसाठी या ठिकाणी गेले असता कोणताही वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता. तसेच खड्डे बुजविण्यासाठी जे डांबर टाकले जात होते ते खड्यातील पावसाचे पाणी स्वच्छ न करता टाकत खड्डे बुजले जात असल्याचा प्रकार त्यांच्या समोर आला. तात्काळ यासंदर्भात मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून रस्त्यांची डागडुजी योग्य पद्धतीने करावी अशा सूचना यावेळी आमदार भोळे यांनी दिल्या आहे.