जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा- जळगाव जिल्ह्यत सद्या टोलनाक्यावरून राजकारण पेटणार असल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. कारण राष्ट्रवादी पक्षाने याच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. केंद्रीय रस्ते विभागाने जळगाव जिल्ह्यातील नाशिरबाद ते मुक्ताईनर चौपदरीकरण रस्त्याचे काम सुरु आहे त्याची वसुली १५ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आली आहे . मात्र राष्ट्रवादी काँग्रेस ने त्याला विरोध केला असून आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात टोलनाके सुरु होण्याबरोबर टोल विरोधात राजकारणही पेटणार असल्याचे चिन्हे दिसू लागली आहेत.
नशिराबाद ते मुक्ताईनर असा चौपदरी महामार्ग तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यातील काही भागाचे काम पूर्ण झाले आहे. तसेच नशिराबाद ते भुसावळ प्रयन्त रस्त्याचे काम काही प्रमाणात झाले आहे . मात्र या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात काम बाकी असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ने केला आहे. आता याच रस्त्यावर नशिराबाद येथे टोलनाका सुरु करण्यात येणार आहे . दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा टोलनाका सुरु होण्याच्या आधीच विरोधाचे हत्यार उपसले आहे. जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांनी सांगितले कि या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही परुंतु त्याची तोल वसुली सुरु करून सर्वसामान्य जनतेला आता पासून भुदंड देण्यात येत आहे. हि वसुली चुकीची आहे जनतेवर हा अन्याय आहे .
राष्ट्रीय महामार्ग विभागाने आधी या रस्त्याचे काम पूर्ण करावे त्यानंतर तोल घ्यावा मात्र आता तोल सुरु करण्यास आमचा विरोध आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱयांना निवेदन देणार असल्याचे त्यानी सांगितले .