अटकेचे टांगती तलवार….
जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | गेल्या महिन्याला नूतन मराठा महाविद्यालयात खोटे मस्टर तयार करतांना ज जि मविप्र अध्यक्ष विजय भास्करराव पाटील यांनी नूतन मराठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य ए बी वाघ, शिवराज मानके, पी ए पाटील यांना रंगेहात पकडले होते या प्रकरणी रितसर फिर्याद देऊन तसेच मस्टर ताब्यात घेऊन गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख यांच्यासह उपप्राचार्य एबी वाघ, शिवराज मानके,पी ए पाटील यांनी जळगाव न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता आज जळगाव न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
याप्रकरणी प्राचार्य देशमुख यांना जामीन नाकारल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मस्टर प्रकरणात प्राचार्य देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.