जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | एमआयडीसी येथील जुन्या औद्योगीक वसाहतीमधील ए सेक्टर मध्ये प्लॉट नं 84,85 मध्ये समृध्दी केमिकल्स या कंपनीतल्या टाकीतल्या गाळात गुदमरून कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे, घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. नेमकं कामगारांचा मृत्यूचे मुख्य कारण गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
यामध्ये रवींद्र गोटू झगडू चौधरी वय – 32 रा चिंचोली ता यावल,मयूर विजय सोनार वय – 32 रा कांचन नगर,दिलीप अर्जुन कोळी रा कांचन नगर मुपो. खिरोदा. ता. रावेर अशी मृतांची नावे आहे, घटना घडल्याचे लक्षात आल्या नंतर मृतांना टाकीतून बाहेर काढण्यात आले व तात्काळ जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ सचिन अहिरे यांनी त्यांना मृत घोषित केले.
एमआयडीसी मध्ये दुर्घटना घडल्या नंतर पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक अधिक्षक कुमार चिंथा यांनी आपल्या सहकार्यांसह या कंपनीची पाहणी केली.त्यांनी या दुर्घटनेबाबतची माहिती जाऊन घेतली आहे. शेती संबंधी विविध केमिकल तसेच लिक्विड समृद्धी केमीकल कंपनीत तयार केली जातात कामगार नेहमी प्रमाणे आपली काम करीत होती मात्र गाळ काढत असताना टाकीत पडल्याने कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी अधिक चौकशी करीता कंपनी मालक सुबोध सुधाकर चौधरी , सुयोग सुधाकर चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.