जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा – महानगरपालिकेने जळगाव शहरात सर्व खांबांवर पतदिवे बसविले आहेत, त्यमुळे मनपाची ५० टक्के वीज बचत होत आहे.ईएसएल कंपनीने शहरात पतदिवे बसविण्याचे काम पूर्ण केले असून महापौर जयश्री सुनील महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पतदिवे संदर्भात नागरीकांना तक्रारी साठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे .
ईएसएल या कंपनीला शहरात पतदिवे लावण्याचे काम दिले होते याबाबत महासभेत एकमताने हा ठराव पारित करण्यात आला होता . २० नोहेंबर २०१८ रोजी कंपनीला कार्यादेश देण्यात आले होते गेल्या महिन्यात कंपनीने काम पूर्ण केले आहे. शहरात आदि १५४६७ इतके पतदिवे होते त्यानंतर कंपनीने शहराचे सर्वेषण केले असता जळगाव शहरात १९०७७ खांब आढळून आले. ईएसएल ने शहरात १९३२८ पतदिवे बसविले. एलईडी व्यतिरिक्त इतर लाईट मिळून सद्या २०५०० पतदिवे आहेत. शहरात असलेल्या एलईडी पतदिव्यांना यापूर्वी १३११ किलोव्हाट एवढी वीज प्रतिदिन लागत होती . मात्र आता केवळ ६८९ किलोव्हाट एवढी वीज लागत आहे . शहरातील पत दिव्यांची आज ५० ते ५२ टक्के वीज बचत होत आहे . या कंपनीला पतदिव्यांची ७ वर्ष देखभाल व दुरुस्ती करायची आहे . महापौर जयश्री महाजन यांनी याबाबत नागरीकांच्या सुविरे साठी एक हेल्पलाईन नंबर देखिल सुरु करण्याचे सांगितले आहे . टोलफ्री क्रमांक १८००१८०३५८० यावर किवा कंपनीच्या वेबसाईट वर देखील तक्रार करता येणार आहे . जनतेने तक्रार केल्यानंतर ती ४८ तासात सोडविणे कंपनीला बंधनकारक आहे .