जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | तरसोद ते फागणे महामार्गाचे काम प्रगतीपथावर असताना या कामासाठी लागणाऱ्या मटेरियलचा प्रकल्प पोखरी व पोखरीतांडा या गावाजवळ असून ओव्हरलोड गाडयांमुळे पोखरी व पोखरीतांडा गावाच्या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झालेली आहे. तसेच या खराब रस्त्यामुळे दोन अपघात देखील घडले आहेत, पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने नागरिकांना या रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे ठेकेदार आपल्या मर्जीप्रमाणे रस्त्याचा वापर करून घेत आहे. मात्र दुरुस्ती करण्यात दुर्लक्ष करीत असल्याचा गावकऱ्यांनी आरोप केला याची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी “प्रताप रुपी” स्वभाव दाखवत ठेकेदाराला वठणीवर आणले, पुनश्च रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषद सदस्य प्रताप गुलाबरावजी पाटील हे पोखरी तांडा येथे विकासकामांच्या उदघाटनासाठी गेले असता, तेथील ग्रामस्थांनी रस्त्याची व्यथा त्यांच्याकडे मांडली. गेल्या अनेक दिवसापासून तरसोद ते फागणे या महामार्गाचे काम सुरू आ.हे यासाठी या भागातील वाहने येण्या-जाण्यासाठी रस्त्याचा वापर सुरू आहे. मात्र अवजड वाहने वाहतूक होत असल्याने या रस्त्याचे संपूर्ण दुर्दशा झालेली आहे. मात्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी तात्काळ दाखल केले रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरू झाल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
या पूर्वी देखील पोखरी तांडा येथील रस्ता दुरुस्ती करण्या संदर्भात सूचना केल्या होत्या मात्र सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करण्यात येत होते ठेकेदाराला या रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल दुरुस्तीसाठी निर्देश दिलेले होते. मात्र जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी दखल घेतल्याने रस्त्याचा विकास कामाला सुरुवात झाली आहे.