जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा :जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीचे वारे सध्या जोरात वाहत आहे. निवडणुकीची प्रशासकीय तयारी सुरू असतांना मात्र राजकीय नेत्यांच्या हालचाली मंदावल्या आहेत. कारण या निवडणुकीतील सर्वपक्षीय पॅनलसाठी एकत्र बैठक झाल्यानंतर नेत्यांकडून बँकेतील आगामी सत्ता स्थापनेसाठी नेत्यांची चुप्पी साधली जात असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा बँकेच्या पॅनल संदर्भात जागा वाटपात खरी मोठी अडचण राजकीय नेत्यांसमोर असल्याचे बोलले जात आहे. या निवडूकीत राष्ट्रवादी, भाजप
आणि शिवसेना, काँग्रेस पक्ष रिंगणात आहेत. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ् खडसे हे सध्या काही कारणावरुन मुंबईत असल्यामुळे निवडूकीबाबत सर्व पक्षीय पॅनलची भुमीका समजु शकली नाही. माजी मंत्री गुलाबराव देवकर, रष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष् रवींद्र भैय्या पाटील, आमदार सतीष्अण्णा पाटील या नेत्यांच्या नजरा एकनाथ् खडसे यांच्या अंतीमि निर्ण्याकडे लागल्या आहेत. तर शिवसेना नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काही राजकीय नेत्यांच्या व इच्छुक उमेदवारांच्या भेटी गाठी घेणे सुरू केले आहे. तसेच भाजप नेते, आ.गिरीष महाजन, यांनी अद्या आपले खरे पत्ते उघड केलेले नाहीत. भाजप या निवडणुकीत स्वताची वेगळी चुल मांडण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसने निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्याने त्यांचे काही उमेदवार दुसऱ्या पॅनलमध्ये जाण्याची श्यकयता वर्तविण्यात आली आहे.जिल्हा बँकेत काँग्रेसचा एकच संचालक असल्याने त्यांना इतर पक्षाकडून फारसे महत्व दिले जात नाही. दिवसेदिवस इच्छुक उमेदवारांची भाउगर्दी वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पॅनल मध्ये जागा वाटपात मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेत कोणतेही एक किंवा दोन पक्ष एकत्र येवुन सत्ता स्थापन करणे शक्य नाही. तालुकानिहाय विवीध कार्यकारी सहकारी सोसायटी मतदार संघातील स्थीति आणी राखीव जागावरील राजकीय गणीत वेगवेगळे असल्याने संभाव्य दोन्ही पॅनलला नेत्यांना पक्ष् विरहीत इच्छूक उमेदवारांना सोबत घ्यावे लागणार आहेत.