नागपूर राजमुद्रा वृत्तसेवा : काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपनं आपल्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत भाजपचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारी नाही, असं खणखणीत उत्तर फडणवीस यांनी दिलंय.
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी भेट घेतली. त्यांनी विनंती केली की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यावर मी त्यांना सांगितलं की आमची कोअर कमिटी, आमचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करतील आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत चर्चा नाही. भारतीय जनता पार्ट सौदेबाजी करत नाही. काही पत्रकारांना अलीकडच्या काळात पतंग उडवायची सवय झाली आहे. आमच्या 12 आमदारांचं निलंबन हे नियमबाह्य आहे. आम्ही त्याबाबत कोर्टात गेलो आहोत. आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि बाहेरही लढू. आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारे आम्ही नाही, असं फडणवीस म्हणाले.
राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपनं आपल्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत भाजपचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारी नाही, असं खणखणीत उत्तर फडणवीस यांनी दिलंय.
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवरील पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दरम्यान, ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात भाजपनं आपल्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याची अट ठेवल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत भाजपचा असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचं आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारी नाही, असं खणखणीत उत्तर फडणवीस यांनी दिलंय.
बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी भेट घेतली. त्यांनी विनंती केली की राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यावर मी त्यांना सांगितलं की आमची कोअर कमिटी, आमचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करतील आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत चर्चा नाही. भारतीय जनता पार्ट सौदेबाजी करत नाही. काही पत्रकारांना अलीकडच्या काळात पतंग उडवायची सवय झाली आहे. आमच्या 12 आमदारांचं निलंबन हे नियमबाह्य आहे. आम्ही त्याबाबत कोर्टात गेलो आहोत. आम्ही कोर्टातही लढाई लढू आणि बाहेरही लढू. आम्ही संघर्ष करणारी माणसं आहोत, सौदेबाजी करणारे आम्ही नाही, असं फडणवीस म्हणाले.
दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज आहे. काँग्रेसनं भाजपसमोर लोटांगण घातलं अशी चर्चा सुरु असल्याचं पत्रकार म्हणाले. त्यावेळी लोटांगण नाही किंवा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस नाराज नाही. याबाबत सर्वांना माहिती होती. ही परंपराच आहे. त्याचबरोबर आम्हाला निवडणूक जिंकण्याची पूर्ण खात्री आहे. मात्र, महाराष्ट्राची परंपरा, जो प्रघात आहे तो कायम राहावा म्हमून फडणवीसांची भेट घेतली. ती दोघांचीही जबाबदारी आहे, असं थोरात म्हणाले.
राज्यात होणाऱ्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यामुळेच राष्ट्रवादी-शिवसेना नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. काँग्रेसला महाविकास आघाडीवर विश्वास उरला नाही का? ज्यामुळे अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन विनंत्या कराव्या लागल्या? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध करायची असेल तर त्या बदल्यात भाजपचे निलंबित 12 आमदारांवरील कारवाई रद्द करण्याची मागणी केली आहे. या साठमारीच्या राजकारणामुळे आणि काँग्रेस नेत्यांच्या आजच्या लोटांगण प्रयत्नामुळे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.