नशिराबाद राजमुद्रा वृत्तसेवा : नशिराबाद येथील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले याचा नगरपरिषद विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रोशन शहा, सलीम शहा यांनी केली आहे.
हे मोकाट कुत्रे रात्री अपरात्री कामावरून येणाऱ्या दुचाकी मोटर सायकल अथवा पायी घरी येणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून येत असतात. त्यामुळे संबंधित वाहन चालकाचा ताबा सुटून अपघात घडतात. तसेच झुंडीच्या झुंडी माणसांवर हल्ला झालेला आहे. तसेच लहान बालकांना चव घेतल्याच्या घटना घडल्या आहेत.
त्यामुळे आता लहानमुलांचे घराबाहेर खळणे सुद्धा बंद झाले आहे. कुत्रे हे संबंधित परिसरात घाण करीत असल्याने रोगराई पसरण्याची श्यक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत देखील संबधीत विभागाला लेखी अर्ज देण्यात आले आहे. परंतु अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आले ली नाही तरी प्रशासनाने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी रोशन शहा यांनी केली आहे.