जळगांव राजमुद्रा वृत्तसेवा : सरकारी कार्यालयातील कर्मचारी दैनंदीन कामकाज प्रकरणी स्वस्त तसेच तणावमुक्त रहावे यासाठी केंद्रसरकारच्या आयुष मंत्रालयाकडून 5 मिनीटांचा योगा ब्रेक प्रत्येक शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी सक्तीचा करण्यात आला. यासाठी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना वाय ब्रेक ॲप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले आहे. कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने या निर्णयाची तीन दिवसापासून अंगलबजावणी सुरू केली असण्याची माहीत प्रभारी कुलसचीव डॉ. शामकांत भादलीकर यांनी दिली. आयुष मंत्रालयाद्वारा काढण्यात आलेले पत्र नुकरते विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. यामुळे जळगाव विद्यापीठाने विद्यापीठ परिसर, परिसर संस्था, प्रशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना योगा ब्रेक प्रोटोकॉल नुसार घेण्यासाठी पाच मिनीटे वेळ काढण्याचे आदेश दिले आहे.