मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्याच्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता 4 ऑक्टोंबर पासून कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू होणार आहेत. कोरोनाची स्थिती सामान्य झाल्याने राज्यसरकारने हा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. राज्यातील शाळा सुरू करण्या संदर्भात ऑगस्ट महिन्यात एकदा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यावेळी तो निर्णय स्थगित करण्यात आला. मुख्यमंत्री यांनी कोरोना नियमांचे पालन करुन शाळा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.