जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा : जळगाव जिल्हयाती सर्व ओबीसी समाजातील जाती संघटना, राजकीय पक्ष, यांची ओबीसी आरक्षण हक्क परिष्दी जळगांवत 25 सप्टेंबर रोजी आयोजित करण्या़त आली आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त सामाजीक कार्यकर्त्यांनी उपस्थ्ति रहावे असे आवाहन लोकसंर्घष मोर्चाच्या प्रतीभा शिंदे यांनी केले आहे.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, ना. गुलाबराव पाटील, सतीषअण्णा पाटील, आ.कपिल पाटील, जेष्ठ धनगर समाज नेते रामहरी रूपनवर,अध्यक्ष ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी संघटना शब्बीर अन्सारी , ज्येष्ठ शल्यविशारद तथा समाजसेवक डॉ.ए.जी.भंगाळे,अध्यक्ष- लोकसंघर्ष मोर्चा प्रतिभाताई शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. याबाबत माहिती अशी की
या देशात सर्व वर्गांना त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, व सामाजिक मागासलेपणावर आधारित त्यांना शिक्षण, नोकरी, व राजकीय क्षेत्रात समान संधी मिळाली पाहिजे यासाठी आरक्षण देण्याची गरज आहे म्हणून या सर्व क्षेत्रांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यात आले आहे मात्र याबाबत सातत्याने ओबिसिंवर अन्याय करण्यात आला आहे. आणि आता तर सर्वोच्च न्यायालयाच्या आडून या देशातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून ओबीसी आरक्षण रद्द करून टाकले आहे त्यामुळे राज्यात ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना राजकारणातून घरी बसवण्याचाच निर्णय घेतला गेला आहे. आणि ही सुरवात आहे आज राजकारणातले आरक्षण संपवले या पुढे जर अजूनही जातीनिहाय जनगणना झाली नाही तर शैक्षणिक व आर्थिक आरक्षण ही संपवले जाणार आहे त्यामुळे आता जर आपण एकत्र आलो नाही तर पुन्हा एकदा आपण मागासलेपणाच्या खाईत लोटले जावू आपल्या पुढील पिढ्यांचे जगणे मुश्कील होणार आहे
या अन्यायाचा जाब मागण्यासाठी व आपले आरक्षण वाचवण्यासाठी जातीभेद, पक्षभेद सारे दूर ठेवून “आम्ही ओबीसी – एक जामाती”निर्धार करत दि. २५ सप्टेबर ला एकत्र जमून विचारमंथन करण्यासाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे.. आता नाही तर कधीच नाही ही वेळ आली आहे जात ही संकल्पनाच मुळात असमानता व भेदाभेद यावर आधारित आहे जाती अंत व्हावा म्हणून या पुरोगामी महाराष्ट्राने नेहमीच पुढाकार घेतला आहे मात्र वर्ण व्यवस्थेने येथील समाजाला जातीजातींमध्ये विभागून नेहमी भेदाभेद करत या जातींमध्येही विषमता पेरली आहे शतकानुशतके रुजलेली हि विषमता दूर करण्यासाठी या वर्ण व्यवस्थेला त्याच भाषेत उत्तर देत खऱ्याअर्थाने सामाजिक समता व न्याय प्रस्थापित करायचा असेल तर या सर्व मागास जाती समूहांनी एकत्र येण्याची गरज आहे ओबीसींमधील जातीजातीत विखुरले पणाचा फायदा घेत आता कोणाला राजकारण करू द्यायचे नाही. आपल्या भवितव्या साठी आणि सामाजिक,आर्थिक व राजकीय प्रतिष्ठेत समान संधी मिळालीच पाहिजे या साठी ओबीसी एकजूट उभी करू या असा निर्धार या परिषदेत करण्यात येवून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल.