जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरात डेंगू मलेरिया मोठ्या प्रमाणात पसरला आहे. आणि लहान मुलांमध्ये अधिक प्रसार होण्याची शक्यता आहे.यासाठी महापालिकेने शहरातील आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावणे गरजेचे आहे. आधीच आपण कोरोंना सारख्या महाभयंकर आजारातून नुकतेच बाहेर पडत आहोत. कोरोणामुळे बऱ्याच लोकांनी आपले आत्पेष्ट नातेवाईक गमावले या करणामुळे सगळ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. डेंगू आणि मलेरिया सारख्या आजाराने जर आपण नियंत्रणात नाही आणू शकलो तर ही जळगावकरांची प्रतारणा ठरणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने करण्यात आली आहे.
महापालिकेने पाच वर्षाकरिता 75 कोटी चा अतिशय महाग असा ठेका म्हणजेच सव्वा कोटी रूपये दर महिन्यात एवढे पैसे खर्च करूनही जळगाव शहरातील नागरिकांना चांगया प्रकारच्या स्वच्छतेच्या सुविधा मिळत नाही प्रत्येक प्रभाग अर्ध्या पेक्षाही कमी पगारावर कामगार लावतो आहेत सफाई कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या हजेरी पटावर सह्या घेऊन पंधरा ते वीस दिवसांचा पगार त्यांच्या दिला जातो त्यामुळे ते कामच करत नाही वॉटर ग्रेस कंपनीने पूर्ण क्षमतेने कामगार लावलेले नाहीत, उलट आरोग्य यंत्रणेतील मनपा कर्मचाऱ्यांना यासाठी कंपनी कडून डबल पगार मिळतो.
जळगाव मनपा आरोग्य विभागातील खालपासून वरपर्यंत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना मनपाचा पगार तर मिळतोच, व त्या व्यतिरिक्त वॉटर ग्रेस कंपनीला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे जसे कमी कर्मचारी लावणे कामावरील लोकांना अर्धा पगार देणे त्यांचे हजेरी मास्टर पूर्ण महिन्याच्या सह्या घेऊन पंधरा ते वीस दिवसांचा पगार देणे दंड आकारणी झालेला, दंड माफ करणे यासाठी वॉटर ग्रेस कंपनीमार्फत सुद्धा मनपाच्या आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना महिन्याचा पगार वॉटर ग्रेस कंपनी कडून सुरू केला आहे आणि या भ्रष्टाचारात सर्व सहभागी आहेत जळगावकरांना वेठीस धरले जात आहे कोणताही अधिकारी अद्यावत उपायुक्त कोणीही फील्ड वर उतरून काम करत नाहीत, कोणीही प्रभागात अचानक भेटी देत नाही की ; रोजची साफसफाई होत आहे किंवा नाही याची कोणतेही तपासणी मनपा अधिकारी करत नाही हे सर्वच न करण्यासाठी व त्यांना मनपा येवढाच पगार वॉटर ग्रेस कंपनीकडून दिला जात आहे. हे सर्व जळगावकर शहरातील नागरिकांसाठी घातक आहे. यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना विनंती केली आहे की तुमच्याकडून आरोग्य यंत्रणा कार्यान्वित होत नसेल तर त्यांनी आधीच सेवानिवृत्ती घ्यावी व आम्हा जळगाव करांना मोकळे करावे.असे राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी अर्बन सेल कडून उपस्थित सवाल ?
1) मनपाने साफसफाई काटेकोर पणे दैनंदिन होते आहे की नाही याची खात्री वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.
2) धूर फवारणी शहरात प्रत्येक वार्डात प्रत्येक गल्लीत घराघरात फवारणी होणे गरजेचे आहे तसंच डेंगू मलेरिया हे महाभयंकर आजार आटोक्यात येतील. आणि हे मनपा मार्फतच होऊ शकते आणि त्यांनी ते गांभीर्याने केले पाहिजे
3) तसेच आम्ही वाटर ग्रेस कंपनीच्या स्पेशल ऑडिट ची मागणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेकडे केली आहे.
वॉटर ग्रेस कंपनीवर जळगाव शहर महानगरपालिका मेहरबान का?
वाहने विनामूल्य वापरण्यास का दिले?
साफसफाई च्या ठेक्याचे टेंडर आधी फ्लॅश झाले तेव्हा ठेकेदाराला मनपाची वाहने भाडेतत्त्वावर मिळतील, याची भाडे आकारले जाईल, मात्र शेवटच्या वॉटर ग्रेस कंपनीला टेंडर मिळवून देण्यासाठी शेवटचे टेंडर डमी कंपनी टाकून वॉटर ग्रेसलाच टेंडर मिळेल याची व्यवस्था केल्यावर मनपाचे वाहने ट्रॅक्टर, घंटागाडी, जेसीबी आणि इतर ही सर्व वाहने विनामूल्य मिळतील अशी अट घातली. यात मनपाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे शासकीय वाहने खासगी ठेकेदाराला विनामूल्य वापरण्यास देण्याची बहुदा ही भारतातली पहिलीच घटना असेल याला जबाबदार कोण? असा सवाल देखील उपस्थित केला आहे.
अर्बन सेलच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी देशमुख,महानगराध्यक्षा मंगला पाटील,मनोज वाणी,अशोक लाडवंजारी, मिलिंद सोनवणे, जुबेर खाटीक, राकेश पाटील,प्रवीण महाजन, चांगरे,मुविकोराज कोल्हे,यशवंत पाटील, युगल जैन, आदी उपस्थित होते.