मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना त्यांच्याच मुक्ताईनगर मधून जोरदार धक्का दिला आहे नगराध्यक्षांसह अकरा नगरसेवक बोदवड तसेच मुक्ताईनगर फोडल्याने राजकीय खळबळ उडाली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे पक्ष प्रवेश सोहळा पार पाडण्यात आला आहे यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी विश्वासात घेतले हे विशेष होते.
गेल्या काही महिन्यापूर्वी जळगाव महापालिकेत सत्तांतर करत भाजपचे एकूण 27 नगरसेवक ओळख सत्तांतर केले यामध्ये खडसे यांचा अधिक वाटा असल्याचे बोलले जात होते मात्र काही काळानंतर शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी एकत्रित हे सत्तांतर घडवून आणले असे सांगितले जाते मुक्ताईनगर येथील आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या काळात ज्याप्रमाणे मुक्ताईनगर येथील दहा नगरसेवक उडून शिवसेनेत आले होते अगदी त्याचप्रमाणे आता बोदवडच्या नगराध्यक्षांसह व मुक्ताईनगरातील नगरसेवकांनी शिवसेना प्रवेश केल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे.
खडसे समर्थक असलेले मुक्ताईनगर आणि बोदवड च्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने तसेच खडसे यांच्या बालेकिल्ल्यात सुरुंग लागला आहे. प्रवेश केलेले पदाधिकारी हे पूर्वाश्रमीचे भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले असले तरी ते खडसे समर्थ कस होते यामुळे अडचणीच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेने आपला बाण जोरदार चालवल्याचे पाहायला मिळत आहे.
आगामी काळात संपूर्ण जिल्हा शिवसेनामय करण्यात येईल असे वारंवार शिवसेना नेत्यांकडून सांगण्यात येत होते. त्याचा प्रत्यय यायला आता सुरुवात झालेली आहे भाजपचे देखील चिंता नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशामुळे वाढणार आहे. यापूर्वी मंडपात झालेले सत्तांतर यामुळे शिवसेनेने भाजप राष्ट्रवादीसह राजकीय पक्षांना मोठे आव्हान उभे केले आहे.