भडगाव राजमुद्रा वृत्तसेवा |सध्या कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरणाचा जोर वाढला आहे. गाव पुढारी तर गावात मीच लस विकत घेऊन गावकर्याना देतो आहे असा अविर्भावात वावरत आहे. प्रत्यक्षात ही लस शासनाकडून उपलध्द करून देण्यात येत आहे. त्यामुळे पुढार्याच्या आयजी च्या जिवावर बायजी उधार ची खमंग चर्चा रंगताना दिसत आहे.
कोरोनाचा संभाव्य धोका पाहाता शासनाने लसीकरणाला चांगलाच वेग दिला आहे. शहरासह प्रत्येक गावात लसीकरणाचे कॅम्प आरोग्य विभागाकडून लावण्यात येत आहे. पण या लस मी आणल्या म्हणुन काही गाव पुढारी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. त्याची बॅनरबाजी करून जशा पैसे खर्च करून या पुढार्यानेच लस आणल्याचा आव ते आणतांना दिसत आहे. आगामी नगरपालिका, पंचायत समीती, जिल्हा परीषद निवडणुकीत आपल्याला फायदा व्हावा म्हणुन हा उपद्व्याप त्याच्यांकडुन करण्यात येत आहे. प्रत्यक्षात ही लस आरोग्य विभागाकडून मोफत दिली जात आहे. ही वास्तवता आहे. भडगाव शहरासह ग्रामीण भागात पुढार्याकडुन बॅनरबाजी ही करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाची गोची
पुढार्याच्या लसीकरणाच्या या राजकारणामुळे चांगलीच गोची झाल्याचे चित्र आहे. विषेशत: पाचोरा-भडगाव मतदार संघात आरोग्य विभाग चांगलाच कात्रित सापडला आहे. जिल्हा परीषदेत भाजपची सत्ता असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत भाजप लसीकरणाचे श्रेय घेताना दिसते. तर दुसरीकडे आमदार सेनेचे असल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी आमदारांना सांगुन लसीकरणाची मागणी करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादि ही महाविकास आघाडीचा घटक असल्याने ते ही मागे नाहीत. पाचोर्या तर पक्षांचा लसीकरणाचा दावा अन् प्रत्यक्षात लसीकरण झाल्याचा आकाडा भांडाफोड करणारा होता. स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभाक्षेत्र प्रमुख नितीन तावडे यांनी यासंदर्भात मॅसेज शोसल मिडीयावर फीरवला होता. काही गावात तर चक्क सेना, राष्ट्रवादिचे लसीकरणाचे स्वतंत्र कॅम्प लागले. या सगळ्यात आरोग्य विभागाची चांगलीच गोची होत हे खरं आहे. राजकारणांच्या या हेव्यादाव्यामुळे आरोग्य विभाग नाहक भरडला जात आहे. वास्तविक लसीकरण हे राष्ट्रीय कार्य आहे. यात राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. गाव पुढाऱ्यांनी उगाचच आव न आणता गावातील प्रत्येक नागरीकांचे लसीकरणासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायतांनी यासाठी नियोजन करायला हवे.