पुणे राजमुद्रा वृत्तसेवा । महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय घडामोडींना जोरदार फिरताना पाहायला मिळत आहे. शिवसेनेदेखील सत्ता स्थापने साठी पुण्यात कंबर कसली आहे. खासदार संजय राऊत यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये सभा घेतली यावरून पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका ताब्यात घेण्याच्या सूचना सेनेकडून देण्यात आली आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील पुणे दौऱ्या करून आपली रणनीती जाहीर केली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागावे अशा सूचना देण्यात आल्या आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) भाजपशी युती करावी, असा आग्रह मनसेच्या स्थानिक नेत्यांनी धरला आहे. तसे केल्यास या निवडणुकीत मनसेला फायदा होईल, असे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरु झाली आहे. यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरण्यात आला आहे. यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे नेमकं काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.