मुंबईच्या दत्ता मेघे इंजीनियरिंग कॉलेज मुंबईचा स्तुत्य उपक्रम .
जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा । जागतिक कन्या दिनानिमित्त नवी मुंबई येथील दत्ता मेघे इंजिनिअरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित महिला सशक्तिकरण ऑनलाइन वेबिनारमध्ये पहूर येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .
जागतिक कन्या दिनाच्या पार्श्वभूमीवर काल शनिवार दिनांक २५ सप्टेंबर २०२१ गुगल मीटद्वारे नवी मुंबई येथील दत्ता मेघे इंगिनीरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन वेबिनारचे उद्घाटन सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे यांच्या हस्ते झाले . राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा .नितीन देशमुख यांनी मार्गदर्शन केले .किशोरवयीन मुलींमध्ये वाढत्या वयात होणारे शारीरिक , मानसिक ,भावनिक बदल, मासिक जागृकता,सेल्फ डिफेन्स या विषयांवर स्वयंसेविका निर्मीती भोईर , अनुश्री डोंगरे , पुजा गोसावी ,श्रेया कानसे, सेजल मोरे, समिधा गावलकर , नंदिनी शेळके ,प्रज्वल पाटील ,साक्षी धनवडे , सृष्टी म्हात्रे , श्वेता दर्वे , स्नेहल लवंगरे , सिद्धीका पाटील , मृण्मयी जकाते , सुकन्या मंडल , आरूषी दास यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थीनींच्या शंकांचे निरसन केले . इ. ७ वी ते १० वीच्या सुमारे १०० विद्यार्थिनी वेबिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या .यशस्वीतेसाठी स्वयंसेवक दीपक पवार , विशाल बागवे , आदित्य पुजारी , राज जाधव , निखिल माळी , चिराग महाजन यांचे सहकार्य लाभले .
महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव अण्णा घोंगडे यांनी दत्ता मेघे इंजीनियरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .मुलींनी शिक्षण घेऊन स्वतः च्या पायावर उभे राहून स्वावलंबी जीवन जगावे . स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी . प्रसंगी धीरोदात्तपणे आलेल्या प्रसंगाला सामोरे जावे असे आवाहनही त्यांनी केले . याप्रसंगी शिक्षीका कल्पना बनकर ,माधुरी बारी , अश्विनी पाटील , सोनाली शेकोकारे यांची उपस्थिती होती .या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थिनींना ऑनलाइन पद्धतीने मौलिक मार्गदर्शन लाभले . समन्वयक म्हणून ELC क्लबचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी काम पाहिले .