निळे निशानचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांचा गंभीर आरोप
रावेर (प्रतिनिधी) :- रावेर पंचायत समितीत तात्कालिन बीडीओ हबीब तडवी यांनी शेष फंडाच्या वयक्तीक लाभाच्या योजनेत भ्रष्ट्राचार केल्याचा गंभीर आरोप निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आला आहे.तसेच गटशिक्षण कार्यालयात महापुरुषांचा अनादर करणा-यांना पंचायत राज समितीने तात्काळ निलंबित करण्याची मागणी आनंद बाविस्कर यांनी रावेर शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
पुढे आरोप करतांना बाविस्कर म्हणाले की निंबोल येथील एकाच कुटुंबातील पाच जणांना पंचायत समितीने कायद्याची पायमल्ली करून लाभ दिला आहे.तर सत्तर वर्षीय वयवृद्ध महिलेला पिकोफॉलची मशीन दिली आहे.हा सर्व प्रकार खुप गंभीर असून भ्रष्ट्राचार संदर्भात इतर माहिती देण्यास पंचायत समिती टाळटाळ करीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला तसेच या सर्व प्रकरणाला सत्ताधारी जबाबदार असल्याचे त्यांनी उपस्थित पत्रकारांना माहिती देतांना सांगितले.परीषदेत पुढे बोलतांना श्री बाविस्कर म्हणाले की रावेर शिक्षण विभागाच्या कार्यालयात महापुरुषांचा अनादर झाल्याची मोठी घटना जिल्हात पिआरसी असतांना घडला आहे.हा प्रकार खुप गंभीर असून या सर्व गोष्टींमुळे आमच्या भावना दुखावल्या असून शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी यांना जबाबदार धरुन निलंबन करण्यात यावी अशी मागणी पत्रकार परिषदेत निळेनिशान सामाजिक संघटने केला
यावेळी निळे निशान सामाजिक संघटने तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष महेश तायडे जिल्हा उपप्रमुख सदाशिव निकम तालुकाध्यक्ष चंद्रकांत गाढे तालुका उपाध्यक्ष सुधीर सैगमिरे नारायण सवर्णे शरद,बगाडे अरविंद भालेराव यांची उपस्थिती होती.