प्रत्येकी 500 रुपये तर ग्रामसेवकाना 10.000 रुपये जमा करण्याचे फर्मान
पाचोरा- पंचायत राज समितीच्या (पीआरसी) दौरा सुरु झाला असून यात दौऱ्या साठी शासनाच्या विविध विभागाच्या कर्मचार्याकडून स्वागताच्या नावाखली आर्थिक वसूली करने सुरु झाले आहे.विशेष म्हणजे शिक्षण विभागातील शिक्षकानी प्रत्येकि अर्थ सहाय्य म्हणून सामुहिक पैसे जमा करावे असे तोंडी आदेश जिल्ह्यातील काही गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखाना दिले आहे.त्यात पाचोरा तालुक्यातील केंद्र प्रमुखाना तालुक्यातील प्रत्येकि शिक्षका कडून 500 रुपये जमा करण्याचे तोंडी फर्मान निघाल्याचे कळते असे कलेक्शन करने देखील सुरु झाले आहे हा पैसा कुणाच्या घशात जाणार?या संदर्भात पंचायत राज समिति अध्यक्ष व (पीआरसी) सदस्य आमदरानी खुलासा करावा.या संदर्भात कोणीही जाहिर रित्या वाचयता करीत नसले तरी ही सत्यता समोर येऊ शकत नाही मात्र (पीआरसी) दौऱ्याच्या निमित्ताने शासकीय कर्मचाऱ्यांचे खिसे खाली होतील व शिक्षण विभागाच्या बडया अधिकाऱ्यांच्या घशात कोम्बंले जातील है मात्र नक्की.
महाराष्ट्र विधानसभा नियमालीतिल नियम 239 मधील नियमावली ही समिति दर वर्षी गठित केली असून यात विधि मंडलातील सदस्यांचा समावेश आहे. समिति येन्यापासुन ते निघे पर्यंत जिल्हा परिषद संलग्न सर्व अधिकाऱ्यांना टेंनशनच असते समितीच्या आदरा खातिर नियोजन म्हणून कोटयावधिची वर्गनी जमा केल्याची चर्चा चांगलीच चर्चिली गेली आहे.जळगाव जिल्ह्यातील या समितीचा दिनांक 27. 28. व 29 सेप्टेंबर आसा तीन दिवसांचा दौरा आहे.या समितीचे स्वागत म्हणुन केंद्र प्रमुखा कडून पाचोरा तालुक्यातील प्रत्येकि शिक्षक यानी 500 रुपये तर ग्रामसेवक 10.000 असे आदेश शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केंद्र प्रमुखाना दिल्याचे कळते, विभाग निहाय आपाआपल्या खालील कर्मचार्यांकडून निरोप पाठउन पैशाची जमवा जमव सुरु झाले आहे.वर्गनी जमा केलेली कोटयावधि रुपये समिति साठी की अधिकर्यांच्या घशात कोम्बन्यासाठी या विषयावर अद्यापहि? आहे.मुळात वर्गनी जमा करने कशासाठी याची चौकशी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे असे बोलले जात आहे.