नवी दिल्ली राजमुद्रा वृत्तसेवा । देशात एकीकडे पंजाबच्या राजकीय वळतुळत काँग्रेस मधल्या उलथा- पालथीमुळे कलह निर्माण झालेला आहे तर दुसरीकडे काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी भाजपवरील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधातील आपली आघाडी सुरूच ठेवली आहे. राहुल गांधी साध्या केरळच्या दोऱ्यावर अजून केरळमधील मलप्पुरमध्ये बोलताना त्यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशांच्या एकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी घाव घालत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली त्यामुळे या विषयावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.