अमळनेर राजमुद्रा वृत्तसेवा । अमळनेर येथील मंगळग्रह संस्थेला राज्य पर्यटन पर्यटन दिनानिमित्त पर्यटन वाढीसाठी भरीव योगदान दिल्या बद्दल शासनाच्या पर्यटन मित्र हा पुरस्कार नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या हस्ते देण्यात आला . कोरोनामुळे गेल्या दीड वर्षपासून सर्व क्षेत्राला कमी-अधिक स्वरूपाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. यावेळी उपजिल्हाधिारी भीमराव दराडे, प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण पर्यटन संचालनालयचे उपसंचालक नितीन कुमार मुंडावरे, उपअभियंता पवार, राजेंद्र बकरे, नितीन सोनवणे, जयेश तळेगावकर, रमेश पडवड आदि उपस्थित होते.संस्थेचे उपाध्यक्ष एस एन पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, दिलीप बहिरम, अनिल अहिराव, भूषण पाटील यांनी अभिनंदन केले आहे.