धुळे राजमुद्रा वृत्तसेवा । पांझरा नदीला आलेल्या पुर आल्याने पुराच्या पाण्यात पोहण्याचा मोह तरूणांना आवरला गेला नाही. यात आज सकाळी पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी एक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. वाहून गेलेल्या तरूणाचे शोधकार्य सुरू आहे.
अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पांझरा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. शहरातून वाहणाऱ्या या नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघा तरुणांपैकी दोन तरुण बचावले. त्यांपैकी एक तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. परिसरातील नागरिकांनी या तरुणाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे अद्यापही हा तरुण सापडला नाही. राजेश पवार (वय ३०) असे या वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रशासनातर्फे पांझरा नदीमध्ये पोहण्यासाठी जाऊ नये; असे आवाहन करण्यात आले होते. परंतु प्रशासनाच्या आव्हानाला केराची टोपली दाखवत हौशी तरुणांनी पोहण्यासाठी पांझरा नदीमध्ये उड्या टाकल्या. परंतु या तिघांपैकी दोघ तरुण सुखरूप बाहेर आले असून राजेश पवार हा तरुण प्रवाहात वाहून गेला. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून अद्यापही तरुणाचा कुठल्याही प्रकारचा थांगपत्ता लागला नाही आहे.