पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातील जारगांव चौफुली जवळ एका दुकानातून १ हजार ६०० लिटर अवैध बायोडिझेलचा साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील जारगांव चौफुली नजीक सय्यद सलिम यासीन रा. नुरानी नगर, पाचोरा यांचे दुकान आहे. दि. ३० रोजी सदरील दुकानात अवैध बायोडिझेलचा साठा असल्याची माहिती गोपनीय सुत्रांकडून मिळाल्याने पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे, विकास पाटील, गोपनीय विभागाचे पोलिस कॉन्स्टेबल सुनिल पाटील, किशोर पाटील, विनोद बेलदार, निलेश गायकवाड, योगेश पाटील, दिलीप सुरवाडे, पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक उमेश पुरी, अव्वल कारकून एस. एस. पाटील, शिव पाटील या पथकाने घटनास्थळी जावून तपासणी केली असता अवैध बायोडिझेलने भरलेले २०० लिटरचे ८ बॅरल आढळुन आले.
सदर घटनास्थळी आढळुन आलेले १ हजार ६०० लिटर बायोडिझेल हे बाजार भावानुसार सुमारे १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे असल्याचे यावेळी तपासणी निष्पन्न झाले आहे. यावेळी पथकाने घटनास्थळा संयुक्त पंचनामा करुन अवैध साठवलेल्या बायोडिझेलचे नमुने ताब्यात घेऊन सदरील दुकान सिल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. पाचोरा पोलिसात पुरवठा निरक्षक उमेश पुरी यांच्या
फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.