जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जळगाव महापालिकेत शिवसेनेचे सत्ता आल्यानंतर शहरातील सर्वसामान्य जनतेतून प्रश्न समस्या सुटतील अशी अपेक्षा असताना मात्र बंडखोर नगरसेवक आणि गटनेते त्यामुळे सामान्य जनतेचे प्रश्न ‘जैसे हो वैसे’ असून महापौर-उपमहापौर यांच्यासमोर नवीन आव्हाने आली आहे. महापौर आणि उपमहापौर मार्च महिन्यात निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी भाजप विरोधात मतदान केले होते, त्याविरोधात भाजपचे बंडखोर 27 नगरसेवक नाशिक येथे विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेची कारवाई करणे बाबत याचिका दाखल केली होती. नगरसेवकांनी आपले म्हणणे मांडले असून याप्रकरणी येत्या ५ ऑक्टोंबर रोजी पहिली सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून नगरसेवकांचा मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांना याबाबत नोटीस पाठवण्यात आलेले आहे विभागीय आयुक्तांकडे ही पहिलीच सुनावणी असून याप्रकरणी पुढील प्रक्रिया लवकरच पार पाडली जाणार आहे. विभागीय आयुक्तांकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे, अपात्रते बाबत दाखल याचिकेवर सर्व नगरसेवकांनी आपले म्हणणे देखील सादर केले आहे. या प्रकरणी आता प्राथमिक चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात येत असून संबंधित प्रकरणे अर्जदार यांच्या विरोधात याचिका दाखल आहे. अशा सदस्यांची देखील आपली बाजू मांडण्यासह या प्रकरणातील साक्षीदारांची बाजू देखील विभागीय आयुक्तांकडून ऐकून घेतली जाणार आहे.