जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्ह्यात झालेल्या विविध तक्रारी संदर्भात पंचायत समिती समोर अनेक संघटना पदाधिकारी यांनी निवेदन देऊन पाऊस पाडला आहे. त्यामुळे समिती आता या तक्रारींवर काय न्याय देते याकडे लक्ष लागले आहे, आणि या प्रकरणी चौकशीचे कारवाईचे आदेश असतांना देखील कारवाई झाली नसल्याचे व्यक्त केले जात आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळे, पी आर सी च्या नावाखाली आरोग्य विभागाकडून वसुली केली जात असल्याची तक्रार सीईओ डॉक्टर पंकज आशिया यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीची प्रत त्यांनी पंचायत राज समितीच्या अध्यक्षांकडे दिली आहे, तसेच विविध अनेक तक्रारी पंचायत राज समिती सदस्य आणि अध्यक्ष यांच्याकडे देण्यात आले आहे. ती प्रामुख्याने समावेश असलेले आमदार किशोर पाटील यांची जिल्हा जागृत मंचचे शिवराम पाटील यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध तक्रारी केल्या आहेत. तसेच सुरेश पांडे, डॉक्टर सुभाष राणे, दिपक गुप्ता, अनिल नाटेकर, अमोल कोल्हे, राकेश वाघ, पाटील, गुरुनाथ सैंदाणे, नीलकंठ पाटील, विवेक ठाकरे यांनी देखील तक्रारी केल्या असल्याचे सूत्रांनी सांगितले.