गोवा राजमुद्रा वृत्तसेवा । शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत काल गोवा भेटीवर असताना, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना राज्य पत्रकार संघाची दैनंदिनी भेट देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे गोवा संपर्कप्रमुख शिवाजीराव नेहे व संघाचे पदाधिकारी यांनी त्यांच्यासोबत संघटने बाबत व पत्रकारांच्या विविध समस्या बाबत चर्चा केली. या मी लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक घेऊन राज्यातील नव्हे, तर संपूर्ण मराठी व विविध इलेक्ट्रॉनिक साप्ताहिक पत्रकारांच्या समस्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आली तर यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची दैनंदिनी देऊन स्वागत केले व मराठी पत्रकार संघाचे गोव्यातील कार्याबद्दल सविस्तर आढावा त्यांना सादर करण्यात आला .