जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अपंगत्वाचे सर्टिफिकेट कसे मिळाले? असा सवाल भाजपचे आ. गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर समोर उपस्थित केला आहे. एकीकडे सामान्यांना अपंगत्वाच्या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते तरी देखील त्यांना ते मिळत नाही, मात्र खडसे यांना ते कसे मिळाले याबाबत महाजन यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. हे प्रमाणपत्र महाजन यांच्या हातात कसे लागले असा सवाल माध्यमाने विचारला असता त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हे सर्टिफिकेट पाहायला मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले अपंगांचे प्रमाणपत्र दाखवून एकनाथ खडसे यांची खिल्ली उडवत खडसेंना सर्टिफिकेट कोणत्या आधारावर देण्यात आले व खडसेंना 70 व्या वर्षी अपंगत्वाचे प्रमाणपत्र कसे मिळाले ? असा प्रश्न आ. गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे. खडसेंच्या अपंगांचे प्रमाणपत्र बाबत की आपली तक्रार नसून कदाचित त्यांना अपंगत्व आले असेल असा टोलाही आ. गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
स्पायनल ची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना ६०% अपंगत्व आले असल्याचे स्पष्ट प्रमाणपत्र मध्ये नमूद करण्यात आले असल्याची माहिती देखील या वेळी आ.गिरीश महाजन यांनी दिली आहे. खडसे यांच्यामागे ईडी चौकशी लागल्यानंतर महाजन यांच्यावर खडसे यांच्याकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू झाले आहे यावरून आमदार गिरीश महाजन यांनी देखील खडसे यांचे अपंगत्वाचे सर्टीफिकीट माध्यमांसमोर आणून खळबळ उडवून दिली आहे.