नवी दिल्ली राजमुद्रा वृत्तसेवा । माझ्या आयुष्यात मी चांगल्या टीकांना खूप महत्त्व देतो, अशा टीकाकारांबद्दल मला आदर आहे, पण दुर्दैवाने टीकाकारांची संख्या कमी झाली आहे आणि फक्त आरोप करणाऱ्यांची जास्त. हे शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहेत. आपल्या राजकीय जीवनाची 20 वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी ओपन मॅगझिनला मुलाखत दिली, त्यात त्यांनी विविध मुद्द्यांवर मनमोकळेपणे गप्पा मारल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, खेळ खेळणारे बरेच लोक आहेत. पण, टीका करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. संशोधन करावं लागते, अशा वेगाने धावण्याच्या काळात, लोकांकडे त्या वेळेचा अभाव असतो, त्यामुळे मला जुन्या टीकाकारांची आठवण येते. शिवाय आपली उद्देश हा लोकांची मदत करणं हाच असतो असंही मोदी म्हणाले.