(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शहरात आज (ता 17) पोलीस अधीक्षक डॉ.श्री.प्रविण मुंढे यांचे संकल्पनेतुन जळगाव जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी कोविड लसीकरण व मास्क वितरण कार्यक्रम सकाळी 10:00 वाजता पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागेश चव्हाण उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमासाठी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, के.के.कॅन्स् जळगावचे रजनीकांत कोठारी, रेडक्रॉस सोसायटीचे सचिव विनोद बियाणी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक दिलीप पाटील, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, रा.पो.उपनिरीक्षक भारत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमादरम्यान 50 दिव्यांग बांधवांना पोलिसांतर्फे कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित माळी यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहाय्यक फौजदार रावसाहेब गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल सतीश देसले, दीपक सुरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदर केंद्रावर ज्यावेळी लसीकरण करण्यात येईल तेव्हा दिव्यांग बांधवांना प्राधान्याने लस दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.