जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भाजप मध्ये काही लोकांनी मोठ्या प्रमाणात छळ केला यामुळे पक्ष सोडण्याची वेळ माझ्या वर आली 40 वर्ष ज्या पक्षासाठी मेहनत मेहनत घेतली तो भाजप नाथाभाऊला झाला नाही तर तुम्हाला काय होणार म्हणून सगळे एकत्र या असे आवाहन माजी मंत्री खडसे यांनी कार्यकर्त्यांना एका कार्यक्रमा दरम्यान केले आहे. भाजप सह विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता टीका देखील त्यांनी केली आहे. माझ्यावर गंभीर आरोप करून माझा छळ करण्यात आला, अनेक भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले, गेल्या विधानसभेला तिकीट कापले, कन्या रोहिणी खडसे यांना तिकीट दिले मात्र त्यांना पराभूत करण्यासाठी देखील यंत्रणा राबविण्यात आल्याचा खबळजनक आरोप खडसेंनी फडणवीस व महाजन यांचे नाव न घेता केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून खडसेंची राजकीय लढाई सह कायदेशीर लढाई देखील सुरू आहे. वेगवेगळ्या व्यासपीठावर खडसेंनी आपली भाजप सोडण्याची खदखद बोलून दाखवली आहे. काही दिवसांपासून खडसेंनी माध्यमांसमोर येणे टाळले होते मात्र कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी करण्यावर त्यांनी अधिक भर दिल्याचे दिसून आले आहे. खडसे यांचे काही समर्थक सध्या भाजप मध्ये आहे. त्यांना राष्ट्रवादीत आणण्यासाठी पुन्हा हालचालींना वेग देण्यात आला आहे. कार्यकर्ते ऐनवेळत वेगळा निर्णय घ्यायला नको म्हणून खडसेंनी थेट मुक्ताईनगर तसेच जिल्ह्यातील विविध भागात जाऊन कार्यकर्त्यांना आपल्या वक्तृत्व शैलीतून बळ देण्याचे प्रयत्न ते करीत आहे. भाजप मध्ये कशा पद्धतीने अन्याय झाला ते कार्यकर्त्यांना वारंवार समजवताना आव्हान दिसून येत आहे.
आगामी निवडणुकांमध्ये उत्तर महाराष्ट्रात भाजप ला जिव्हारी आणण्यासाठी राष्ट्रवादी खडसे अश्र वापरू शकते. राष्ट्रवादी ने आता पर्यत खडसेंना योग्य त्या पदाचा बहुमान दिला नसला तरी आगामी काळात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खडसेंकडे मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.