जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । महाराष्ट्र शासनाने 7 ऑक्टोबर 2021 अर्थात घटस्थापना/नवरात्रीपासून राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिकसह गल्लीबोळांतील मंदिरे, धार्मिक स्थळे तसेच परिसरातील रहिवाशांना आवाहन, की आपण दर्शनासाठी मंदिरे, धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जाताना परिसरात अस्वच्छता असल्यास थेट ‘महापौर सेवा कक्षा’शी संपर्क साधा. या कक्षाद्वारे जळगाव शहर महानगरपालिकेतील स्वच्छता व आरोग्य विभागाच्या अधिकार्यांमार्फत स्वच्छता कर्मचार्यांकडून संबंधित परिसर तत्परतेने स्वच्छ केला जाऊन मंदिरे, धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखले जाण्यास मदत होईल.
आपण सविस्तर संवाद करण्यासाठी/माहिती देण्यासाठी ‘महापौर सेवा कक्ष’ हेल्पलाईन क्र. 95 90 269 269 यावर सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 2:30 ते सायं. 5 या वेळेत (शासकीय सुटी वगळता) कॉल करून आपली समस्या/तक्रार नोंदवा. ‘महापौर सेवा कक्ष’ आपल्या समस्या/तक्रारींचा पाठपुरावा करण्यासाठी तत्पर आहे. असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले आहे.