अमरावती राजमुद्रा वृत्तसेवा । अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अखेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पॅनलनं बाजी मारलीय. या निवडणुकीत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख यांचा पराभव केलाय. या विजयानंतर बच्चू कडू यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्यांदाच सहकार निवडणूक लढवली आणि विजयी झालो. राजकारणात कधीही गणितं बिघडू शकतात. गणित हे भागाकार, गुणाकार, वजाबाकी होऊ शकते. त्यामुळे अध्यक्ष कोण होईल हे प्रश्नचिन्ह आहे. माझ्याकडं मतं कमी होते तरी मी विजयी झालो. याचा महाविकास आघाडीवर कुठलाही फरक पडणार नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक 4 ऑक्टोबर रोजी पार पडली. त्यानंतर आज निकाल जाहीर झाला. यात राज्यमंत्री बच्चू कडू यांना 22 मतं मिळाली तर बबलू देशमुख यांना 19 मतं मिळाली. त्यामुळे 3 मतांनी बच्चू कडू विजयी झाले आहेत. शेतकऱ्यांनी चीड व्यक्त केलीय आणि त्याचाच हा विजय आहे. आम्ही हे दाखवून दिलं की जो शेतकऱ्याचा विरोधात जाणार त्याचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी आभार मानतो, असंही बच्चू कडू म्हणाले.
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली, यात परिवर्तन व सहकार पॅनल होते यात राज्यमंत्री बच्चू कडू हे सुद्धा परिवर्तन पॅनल कडून निवडणूक रिंगणात होते. मतमोजणी पार पडली यात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बँकेचे माजी अध्यक्ष व काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलु उर्फ अनिरुद्ध देशमुख यांचा पराभव करत बच्चू कडू यांनी दोन मतांनी विजय मिळवला यात बच्चू कडू विजयी होताच समर्थकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला