रावेर राजमुद्रा वृत्तसेवा । उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरी येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या चार शेतकऱ्यांना भाजपचे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा व कार्यकर्त्यांचा समावेश असलेल्या गाड्यांच्या ताफ्याने चिरडून ठार मारले. बारा पेक्षा अधिक शेतकऱ्यांना भर रस्त्यात गाड्यांखाली चिरडण्यात आले असून
संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीन केंद्रीय काळे कायदे रद्द करा व आधार भावाचा कायदा करा या मागण्यासाठी दिल्लीच्या सिमेवर दहा महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलन सुरू आहे. आंदोलक शेतकऱ्यांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या उपमुख्यमंत्री व केंद्रीय गृहराज्यमंत्री यांना सभा स्थळाकडे जात असताना काळे झेंडे दाखवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उभे होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी याने व त्याच्या गुंडांनी शेतकऱ्यांना शांततामय आंदोलन करत असताना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडून टाकले.
देशात शेतकरी आंदोलनाच्या इतिहासातील ही अत्यंत काळीकुट्ट घटना आहे.रावेर तालुक्यातील विविध पक्ष व संघटना या क्रूर घटनेचा तीव्र शब्दात धिक्कार करत आहे. संयुक्त किसान मोर्चाने सबंध देशभर या घटनेचा तीव्र धिक्कार करण्यासाठी शांततामय मार्गाने निषेध व्यक्त करण आंदोलने करण्याचे आवाहन केले आहे. रावेर तहसील कार्यालयांवर निदर्शनांच्या माध्यमातून हल्ल्याचा निषेध करुन रावेर तहसीलदार मार्फत राष्ट्रपती व सामन्धीताना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी निवासी तहसीदार संजय तायडे याना निवेदन देण्यात आले.