जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा । जामनेर तालुक्यातील पहूर येथे श्री शकेवडेश्वर महादेव मंदिर हॉलमध्ये जामनेर तालुका लोककलावंत वही गायन मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येथील राम मंदिर या ठिकाणी विघ्नहर्ता हॉस्पिटल चे संचालक डॉक्टर सागर गरुड यांच्या हस्ते नारळ वाढवून या लोकं कलावंतांनी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. श्री शेत्र केवडेश्वर महादेव मंदिरात या मिरवणुकीची सांगता करून या मंदिराच्या हॉल मध्ये खानदेश लोककलावंत विकास परिषद जळगाव तथा येथील सप्तशृंगी वही गायन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जामनेर तालुक्यातील कलावंतांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवीचे दीप प्रज्वलन करून व पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश लोककला विकास परिषद महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनोद ढगे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून खान्देश लोककला विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सराफ भिका न्हाळदे गोपाल कोळी बाळू पाटील रामभाऊ पांढरे विठ्ठल कोंडे कृषी सभापती संजय देशमुख रामेश्वर पाटील बाबुराव घोंगडे माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे उपसरपंच श्याम सावळे शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे अरुण घोलप यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी बाबूराव घोंगडे राजधर पांढरे रामेश्वर पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विनोद ढगे यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्रात सर्व विभागात लोककला असताना महाराष्ट्रात खान्देश लोककलेला म्हणजे वही गायन या कलेला शासनाने खानदेशी कला म्हणून मान्यता मिळावी यासाठी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे प्रत्येक विभागात वेगवेगळी लोककला आहे खानदेशात केळी कापूस सोनं असे प्रसिद्ध आहे. खानदेशाची लोककला वही गायन आहे वही गायन लोककला राजमान्यता भेटल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही कला जतन संवर्धन करण्यासाठी एकत्र यावे असे आव्हान विनोद ढगे यांनी केले.
या तालुकास्तरीय जामनेर तालुका खानदेशी लोककलावंत मेळाव्यासाठी तालुक्यातून तसेच जिल्हाभरातून लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण घोलप यांनी केले तर प्रास्ताविक माजी पोलीस पाटील विश्वनाथ वानखेडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय आसस्कर विनोद कोंडे रामचंद्र देशमुख संजय कचरे धनराज देशमुख गणेश बारी विजय पाटील अशोक कोंडे भीमराव देशमुख दौलत धनगर रमेश घोंगडे समाधान पाटील आदींनी परिश्रम घेतले.