जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक लागलेली आहे. त्यातील संचालक पदाची निवडणूक न लढवता बिनविरोध व्हावी असे जिल्ह्यातील काही राजकीय नेत्याना वाटत आहे त्या पार्श्वभूमीवर सेना, भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, एकनाथ खडसे,संदिप पाटील यांनी गळाभेट घेतली. आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांनी उमेदवारी करायची. बिनविरोध संचालक मंडळ बनवायचे.जेडीसीसी संचालक मंडळ घरातच चालवायचे.जेडीसीसी ची तिजोरी खिशात घालायची. असा हा कार्यक्रम मागील सात दिवसापासून राबवला जात आहे.
दरम्यान जिल्हा बँकेची निवडणूक हि बिनविरोध न होता शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणाऱ्यांच्या हाती बँकेची सत्ता जावी खऱ्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी जिल्हा जागृती मंचतर्फे आज जळगाव मधील महाबळ स्थित सैनिक कल्याण हॉलमधे जिल्ह्यातील ईच्छुक उमेदवारांनी बैठकीला उपस्थिती दिली.पारोळा, धरणगाव, एरंडोल जळगाव ,रावेर तालुक्यातील उमेदवार आणि मतदार स्वेच्छेने आले.जाणेयेणे खाणेपिणे यासाठी कोणाचेही लांगुनचागुन न करता,तशी अपेक्षा न ठेवता लोक आलेत.त्यांनी चर्चेत भाग घेतला. आम्हाला सुचना दिल्यात.कोणी अनुभवाचे बोल सांगितले. आणि तयारी ला लागले.
आजी माजी संचालक व आजीमाजी आमदारांच्या विरोधात उमेदवारी करणे.आर्थिक बँकेतील मक्तेदारी मोडून काढणे.बँकेतील काळेगोरे खोदून काढणे.जेणेकरून बँक लुटायची कोणी सराईत चोराने हिंमत करू नये. यासाठी प्रयन्त केले जाणार आहे.
जिल्हा सहकारी बँक ही खास शेती विकासासाठी आहे.कर्ज देणे घेणे सोपे करण्यासाठी आहे. विकास सोसायटी, दूध फेडरेशन जगवणारी आहे.पण तिचा उपयोग साखर कारखाना, हायवेवरील जमीन घेण्यासाठी करीत असतील तर लगाम तर लावलाच पाहिजे. पन्नास हजाराच्या कर्जासाठी शेतकरी ला वणवण फिरलले जाते आणि पंचावन्न कोटी संचालकाला एका साध्या अर्जावर मिळतात.हे थांबवणे गरजेचे आहे.पैसा शिल्लक नाही असे उत्तर शेतकऱ्यांना देणारे संचालक कोटी कोटीचे कर्ज उचलतातच कसे?असा प्रश्न करणारे संचालक जिल्हा बँकेत बसले पाहिजे. जिल्ह्यातील आमदार लोकशाही मार्गाने निवडून आलेत. आणि आर्थिक संस्थेत निवडणूक नको. हा दुष्ट हेतु विरोधात आम्ही जळगाव जिल्हा जागृत जनमंच जनजागृती चे अभियान राबवत आहोत.
प्रत्येक तालुक्यात दौरा करून शेतकऱ्यांना प्रेरित करू. आता मतदान मक्तेदारांना न करता नवोदितांना करा.जो कोणी बँकेत आपली वकालत करील त्याला करा. या बैठकीला कमांडो ईश्वर मोरे, डॉ पृथ्वीराज चव्हाण, एन जे पाटील,नितीन चौधरी, डॉ सुभाष राणे, सुनिल पाटील, उमाकांत वाणी राकेश वाघ आदी उपस्थित होते.