जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । जागतिक शिक्षक दिनाच्या निमित्ताने शैक्षिक आगाज भारत या राष्ट्रीय संस्थेमार्फत ऑनलाईन झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय शांतीलाल पवार यांना स्मार्ट एज्युकेशन ऑफिसर पुरस्कार देण्यात आला. विजय पवार हे मुक्ताईनगर तालुक्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी असून यापूर्वी त्यांनी रावेर, भुसावळ येथे गटशिक्षणाधिकारी, तसेच जिल्हा परिषद उप शिक्षणाधिकारी म्हणुन काम केलेले आहे. डिजिटल बुक आपला जिल्हा आपले उपक्रम, कोरोना काळात ऑनलाईन वेबिनार सारखे उपक्रम त्यांनी राबविलेले आहेत.